STORYMIRROR

Anu Shah

Others

2  

Anu Shah

Others

गुंता 

गुंता 

1 min
14.6K


गुंता

क्षणा क्षणानी

वाढत  चाललेला गुंता सोडवताना

हळूवारपणे एकमेकात अडकलेला

प्रत्येक धागा वेगळा करताना,

वाढत चाललेला गुंता

हतबल करून जातो....

अधिक अधिक गुंतत चाललेले

धागे सोडवताना,

त्यातला हळूवार पणा,  नजाकत

सगळ संपायला लागत

आणि मग ऊरतो फक्त एक तटस्थपणा.

गुंत्याकडे बघण्याचा मग

दृष्टीकोनच बदलून जातो

असहाय्यता हळूहळू वाढू लागते

गुंत्यातले धागे आणि मन

या मध्ये साम्य वाटायला लागते

आणि त्या धाग्या प्रमाणे च

तुझ्यात गुंतत गेलेली मी,

मग मला च असहाय्य वाटायला लागते....


Rate this content
Log in

More marathi poem from Anu Shah