गरीबी
गरीबी
1 min
162
नशिबी माझ्या गरीबी आली
कोणत्या पापाची शिक्षा भोगावी लागली
देवा का रे तू इतकी परीक्षा घेतो
अन्नपाण्यासाठी इवल्यशा जीवाला सतावतो
एवलेशे हातं सुद्धा थकले आता दुसऱ्यांसमोर पसरून
दया का नही येत रे तुला माझ्या डोळ्यातले
अश्रू बघून
मलाही शाळेत जाऊन खूप काही शिकावंसं वाटत
पन पोटपाण्यासाठी सगळी स्वप्न विसरून आहे त्या परिस्तिथीत जगावं लागत
ऊन असो किंवा पाऊस माझा प्रत्येक दिवस हा
रस्त्यावर जातो
पन उद्या नवीन काहीतरी घडलं ह्या आशेवर मी सतत हसत राहतो
देतो तू जगाला पोटभर घास
मग आमच्या गरीबाच्याच नशिबी का रे लिहला उपवास
चप्पल माझी तुटलेली कपडे ते फाटके
तळव्यांना नाही रे मनाला बसतात चटके