STORYMIRROR

Jyoti durge

Others

3  

Jyoti durge

Others

ग्रामीण भारत

ग्रामीण भारत

1 min
347

ग्रामीण भारताच्या अनेक कथा

ग्रामीण जीवनाच्या विविध व्यथा

शहरी माणसं खेड्याच्या प्रेमात

खेड्यातील रानवेडी हिंडतात रानावनात

शुध्द हवा, कौलांरू घराची मज्जाच भारी

शहराला भासे लयभारी

ग्रामीण भागात प्रेमाचा गारवा

मस्त शेणामातीने सारवा

खेड्यात होई आरोग्याचे योग्य संतुलन

शहरी माणसाचे होई असंतुलन

अवकाळी पावसाची बरसात

शेतपीकांची नासाडी होते रातोरात

खेड्याला आहे विकासाची आस

मिळेल का सरकारकडून

नाविन्यपूर्ण योजनाची लयलुट खास

होईल ना ग्रामीण भारताची उज्वल भविष्य पूर्ती

देशाची आहे विविधतेत एकतेची किर्ती


Rate this content
Log in