गोरी शाई
गोरी शाई
1 min
373
काळ्या रंगाने घात केला
आपल्यांनीच उतपात केला
सारी दुनिया विरोधी झाली
तेव्हा मनानंच साथ दिला
मला नेहमी तोललं गेलं
काटेरी नजरेने झेललं गेलं
नसते नुस्के सांगण्यात आले
चांगले विचार टांगण्यात आले
उन्हात अशी जाऊ नको
पावडर वीना राहू नको
हळद लाव व हळद खा
मग हळदीची जादू पहा
मन तेव्हा दुखत होतं
चूक काय ते कळत नव्हतं
गोरं नाही आपली चुक आहे
मनाला मात्र पटत नव्हतं
जिद्द नसती उरी तर
गड तू जिंकलाच नसता
शाई गोरी असती तर
कोरा कागद रंगलाच नसता
