गणपति बाप्पा
गणपति बाप्पा
1 min
27.4K
(ग)जमुखा तू शंकर गौरी च्या मुला
(जा)स्वन्दीचे लाल फुल अतिप्रिय रे तुला ||
(न)म्रता ही वसे, तुझ्या अंतरी
(ना)रद ही तुजवर स्तोत्र गायन करी ||
(श्री)फळ पुजुनी ठेवी तुझ्या चरणी
(ग)रिब तुझे भक्त नेहमी तुलाच रे स्मरणी ||
स(ण) हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी, आहे खूपच मंगलदायी
(रा)स दुर्वा-शमी पत्रांची, वाहित असे तुझिया पायी ||
(या)वेस तु घरा, होवून जावे मखरी स्थित
(आ)वाहन करतो ते स्वीकारावे समजून भक्तीमय ही प्रीत ||
(धी)र मिळतो जीवा घेता नाम तुझे मुखी
(वं)दन करिता तुजला सर्व जन होती सुखी ||
(दु):खहर्ता तू विघ्ने सारी हारी
(तु)ज विण बाप्पा आम्हा कोण तारी ||
(ज)ल्लोष नामघोषा चा तुझ्या करी तृप्त हे कर्ण
(मो)दक गुळ-खोबऱ्याचा करी, नैवेद्य तुझा परिपूर्ण ||
(र)मते मन हे ऐकण्यात तुझि लीला
(या) मनी भक्ती राहावी, हेच साकडे तुला
