गंमत 'ती' च्या शाळेची
गंमत 'ती' च्या शाळेची


खुल्या आसमंतात 'ती'ची शाळा होती शंभर वर्षापुर्वी
चालता बोलताच शिकत होती आल्या गेल्या सोबत
ना कुतुहल होत पुस्तकांच, वही-पेनच
शिकली हा 'शिक्का' घेऊन मिरवण्याच
घुसमटातच गेल आयुष्य म्हणत
शिकवल आपल्या मुलीला गावातल्या शाळेत
झिडकारून समाजाचे बंधन...
तरीही घुसमट 'ती' ची थांबली नाही
आपल्या 'ती' ला उच्च शिक्षण द्यायला
धडपडत राहिली 'ती' च सतत...
'ती' ची 'ती' आता शाळा शिकते
कोंडून स्वतःला एका खोलीत
म्हणते माझी मॉर्डन शाळा आहे डिजीटल
'अॉन लाईन' शाळा भरते आता घराघरातच
वारे वा हे डिजीटल युग '२०२०' चे
'ती' ची शाळा बदलत आहे...
'ती'ला हे बदलते रूप 'बघवत' नाही...
कोंडुन त्या खोलीत मोबाईल वर काय शिकत आहे?
गंमत 'ती'च्या शाळेची ... 'ती' ला काही रूचत नाही
हसत बागडत शिक्षण घ्याव...
असेच 'ती' ला वाटत खरं