STORYMIRROR

Milind Joshi

Others

2  

Milind Joshi

Others

गजल / ग़ज़ल

गजल / ग़ज़ल

1 min
14.4K


तुझ्या नाकारलेल्या पावसाचे काय मग   ?

इथे दाटून आलेल्या नभाचे काय मग ?

कुणी आलेच नव्हते जर इथे आधी कधी

इथे राहून गेले ते कुणाचे काय मग ?

जरी हे मान्य की संवाद आहे संपला

तुझ्या नजरेतल्या त्या आर्जवाचे काय मग ?

तुझ्यासाठी कधी मी गायचे नाही कसे ?

उरी नादावणाऱ्या त्या सुराचे काय मग ?

फुलांचा संपला हंगाम तर मग सांग ना

मनी गंधाळलेल्या ताटव्याचे  काय मग ?


Rate this content
Log in

More marathi poem from Milind Joshi