STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

गझल

गझल

1 min
329

मनी गुलाबी तुझा इशारा

क्षणात यावा असा शहारा


उरात दाटे अनेक चिंता

उगाच वाटे किती पसारा


तुझ्याविणा मी कसे जगावे

जगायलाही तुझा सहरा


अतूट राहो अशीच जोडी

असाच लाभो तुझा किनारा


भरास आली पहाट ओली

सुरात गातो उनाड वारा


हसून गाली ठराव झाला

विचार शंका नकोच थारा


मलाच पाही अथांग डोळे

हवाहवासा तुझा पहारा


भुलून गेल्या दिशा प्रवाही

अनंत वाहे सुगंध धारा


भलेबुरे ते घडून गेले

घडीभराचा न खेळ सारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन