घे भरारी
घे भरारी
1 min
11.7K
मी राणी माझ्या घराची
सत्ता नाही दुजा कुणाची
करेन मी सजावट घराची
मालकीण मी माझ्या मर्जीची
करेन मी उपासना विद्येची
वा लयदार नर्तन कलेची
सांभाळून कामे साऱ्या घराची
नको म्हणणार नाहीच स्वारी इकडची
भ्रमात होते मी, कळले मला ही
घराण्याची अब्रू वाट अडकवे ही
क्षणात चक्काचूर साऱ्या भ्रमाचा
गर्व बाळगे मी उगा फुकाचा
माझ्या घरात सत्ता फक्त माझी
वायफळ बडबड नको तुझी
माझीच मर्जी इथे चालायची
तुझी अक्कल नाही वापरायची
झटकन झाली जाणीव वास्तवाची
खळ्ळकन वाजली साखळी बंधनाची
आता मी भ्रमात नाही रहायची
राज्ञीपद फुकाचे नाही मिरवायची
मीच होईन राणी माझ्या भवितव्याची
कष्टांना कमी नाही करायची
तोडीन सारी सारी बंधने चुकीची
घेईन भरारी, मोजीन खोली आकाशाची