गगनपुष्प
गगनपुष्प
1 min
296
श्यामल वदनी विभावरीच्या
शांत विलसते नवचंद्राचे
शुभ्र स्मित अन् केशांच्या
कृष्ण बटेत खोचले साचे..
चमचमते चंदेरी मोहक
पुष्प टपोरे बघ शुक्राचे..
दिव्य मणी का नभगंगेचा
दिगंगनेच्या मुकुटी साजे?
प्रदोषकाळी कोमट वारा
पुसून टाकी स्वेदकणांते
कोंडून राहिल्या पाहुन लोकां
करुणस्मित मज दिसे नभाचे.
