"तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही"
"तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही"
1 min
765
किती जणांनी म्हटलं असेल किती जणांना
चार क्षणांच्या सोबतीसाठी घेतलेल्या आणा
पण दोनच महिन्यांत फेसबुकावर कळले
आणाभाका विरल्या, आता तिसऱ्याशीच जुळले
या गोंडस शब्दांची जादू कायम असते मनावर
पन्नासदा ठेचकळल्यावरही विश्वास बसतो यावर
वय कशाला सरावं लागतं शब्दांचे कांगावे कळायला
शब्दांविनाच कोण कोण येतं धावून सावरायला
जडलाच खरा जीव कुणाचा, तर धरलेला हात पहा
ऊन-पावसात-अन् सावलीत तसाच घट्ट धरलेला हवा"
असं म्हणून गालात हसले त्यांचे बाबा
म्हटले भावाबहिणीला, "हं..चहा प्या लाडोबा!"
