गावकडंची पोरं
गावकडंची पोरं
1 min
85
खेळ खेळती सारी पोरं
नुसता किलबिलाट अंगना मोहरं
ईथून तिथून पळती
काटी चाक घेऊन
होते शर्यत पहिले
कोन दाखवत पोचुन
रमत-गमत येती पोर पायी
तेवढ्यात दिसे आम्बे रसाळी
बघून पोर सारी पाघळी
पाड़ी आम्बे बसून खात चोकून
विसावा घेई तिथेच तळी ठोकुन
येता येता होई सांजवेळ
करून घेई घाई घाई आंघोळ
बनले पीठलं शेकती भाकरया चुलीवरं
कुरवाळून आई हाथ फिरवी मुलावर
दिसे चांदोबा चकोर
गार गार वारा वाहे भरभर
घेऊन घोंगडी झोपी
गेली ही पोरं
