गाईन म्हणतो
गाईन म्हणतो
1 min
41.3K
गाईन म्हणतो सूरातुनी
वाहीन म्हणतो झऱ्यातुनी….
सूर होऊनी झंकारुनी मग
निर्मळ होईन जळातुनी॥
पुन्हा गर्जतो कड्यातूनी
घुमेन म्हणतो दर्यातुनी….
कोसळणाऱ्या धबधब्यासवे
पुन्हा नीनादिन शिळेतुनी॥
भरून येईन तमातुनी
जळ भरलेल्या घनातुनी….
कडाडीनं मग बिजली मधुनी
निथळत राहीन सरींतूनी॥
फुलून येईन फुलातूनी
भरून देईन करातुनी….
या जगताला आठवेन मग
शब्दभारल्या सूरातुनी॥
