एकटे जग
एकटे जग
1 min
41.4K
एकट्याच जग किती छान असते
पाहिजे ते करायला मोकळ रान असते,
खुप खुश असतो मी कुणाचेही बंधनं नसते,
माझ्या सोबतीला माझी सावली असते.
माझेच विचार माझेच जग दिसते
मोकळेपणानं मात्र मन बहरते
उनाडपणाचं बालिशपण खदखदून हसते
दु:ख माहित नाही सांगा कसं असते ...
एकटं चालून रानात ते बिथरते
सोबतीची सावलीही कधीतरी अंधारात हरवते
म्हणून सोबती जपावे लागते
आपलेपणाने आपसूकच कुणीतरी आपले होते.
