STORYMIRROR

LOKESH KANHAIYALAL SURYAWANSHI

Others

4  

LOKESH KANHAIYALAL SURYAWANSHI

Others

एक लढाई.....अस्तित्वाची?

एक लढाई.....अस्तित्वाची?

1 min
12.1K


एक लढाई..........अस्तित्वाची??? की अतिमहत्वाकांक्षेची.........!!!


नेतृत्वाच्या स्पर्धेपाई, जो तो करतोय घाई।

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


लोकशाहीच्या या मंदिरात

अनेक पक्ष जन्म जात

तैसेच झाले आज आमुच्यात

जो तो म्हणतो माझं ऐका, मीच आहे तुमची शान

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


ज्यांच्यासाठी या संघटना

ज्यांच्यामुळे या संघटना

गृहीत धरून या बंधूंना

अस्तित्वाच्या या लढाईत, केले त्यांना आज गहाण

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


संख्या आमुची आहे सीमित

संघटना या आहे अगणित

उदार होऊन या परिमित

बळ हे टिकवून ठेवायाला, द्या आपुले ही बलिदान

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


अतिमहत्त्वाकांक्षेच्या लोभापायी

नाचवलेस तू आम्हा थाई थाई

शासन म्हणे वारे भाई

यांना तर आमच्या पेक्षाही घाई

आपसातील या गोंधळाचा शासन घेते लाभ लहान

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


शिक्षक माझा पिसला जातोय

पेन्शनसाठी एकटाच लढतोय

23/10 साठी मर मर मारतोय

प्रस्थापितांना मात्र याची, नाही चिंता नाही तान

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


यांचं आहे एकच लक्ष्य

निवडणूक पाहून होतात दक्ष

पतसंस्था आहे याचं भक्ष

कळतंय सगळं याचं तुम्ही असू द्या भान

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


का ठेवावा विश्वास तुम्हावर

सकाळी सन्यास दुपारी गुहेवर

का वाढवता पाप भुईवर

करू नका हे शवविच्छेदन, आहे तुम्हास आमुची आण

कोण सांभाळेल ही कमान, मी महान मी महान।।


Rate this content
Log in

More marathi poem from LOKESH KANHAIYALAL SURYAWANSHI