दसरा
दसरा
1 min
166
सोनियाचा दीन
मुहूर्त साडेतीन एक
उत्सव आनंदाचा सण
रांगोळ्या दारी नेक
आपट्याचे पान
त्याला आज मान
सोन्याच्या जगी
असे त्याला स्थान
नवरात्रीची सांगता
नैवेद्य पुरणपोळी
शस्त्र पूजिले जाते
रावण दहनाची होळी
असत्याची होई हार
विजय तो सत्याचा होई
ही शिकवण धडा
सर्वास हा सण देई