दप्तराचंओझं
दप्तराचंओझं
1 min
27.1K
माझं दप्तर म्हणजे
बाजरी पेरल्यावर
शिल्लक राहिलेल्या पिशवीला
दोन कसण्या लावून
तयार केलेली थैली.
शाळेत...
येत- जात राहिलो
मैलोन -मैल
शाळा ते घर- घर ते शाळा
अनवाणी ऊन-थंडी, पावसात.
परंतू...
माझ्या दप्तराचं कधीच
ओझं झालं नाही मला.
कारण...
दप्तरावरचं बाजरीचं कणीसं
आठवण द्यायचं.
वर्षानुवर्ष लादलेल्या गरिबिच्या ओझ्याचं,
आणि आपला बाप व आपण
कुणबी असल्याचं.
