दिवास्वप्न
दिवास्वप्न
1 min
463
अंधारमय झाले मानवी जीवन
रविकिरणे झाली आज लुप्त,
जग जिंकण्या ईर्षापोटी दानवा
भूतलावर पसरविलेस विष सुप्त !!
सुप्तपणे विष पसरत पसरत
भूतलावरती करू लागला कहर,
ओसाड होऊ लागल्या वड्यावस्त्या
आणि ओसाड होऊ लागले शहर !!
अरे, जग जिंकणे जरी दिवास्वप्न तुझे
स्वप्नासाठी जाऊ लागले कित्येकांचे जीव,
असे अघोरी नीच कृत्य करण्या
तुला आली नाही का रे मानवतेची कीव ?
स्वछंद होते समस्त मानवी जीवन
बंदिस्त झालो आज घरात सारे,
तुझे स्वप्न पूर्ण करण्याकरिता
नराधम देऊ लागले देशद्रोही नारे !!
आज तुझ्या अघोरी प्रयोगामुळे
कदाचित होईल आमचा पराजय,
उगवतील रविकिरणे आमच्याही दारी
करू तुझ्यावरती सहज विजय !!
