उगवतील रविकिरणे आमच्या दारी
उगवतील रविकिरणे आमच्या दारी
1 min
478
अंधारमय झाले मानवी जीवन
रविकिरणे झाली आज लुप्त ,
जग जिंकण्या ईर्षापोटी मानवा
भूतलावर पसरविलेस विष सुप्त !!
सुप्तपने विष पसरत पसरत
भूतलावरती करू लागला कहर ,
ओसाड होऊ लागल्या वाड्यावस्त्या
अन् ओसाड होऊ लागले शहर !!
अरे, जग जिंकणे जरी स्वप्न तुझे
आज जाऊ लागले कित्येकांचे जीव ,
असे अघोरी नीच कृत्य करण्या
तुला आली नाही का रे मानवतेची कीव ?
अरे , स्वछंद होते मानवी जीवन
बंदिस्त झालो तुझ्यामुळे सारे ,
तुझे स्वप्न पूर्ण करण्याकरिता
नराधम देऊ लागले देशद्रोही नारे !!
आज लहान असो का थोरांसाठी
परिस्थिती होऊ लागली भितीमय,
उगवतील रविकिरने आमच्या दारी
करू तुझ्यावरती सहज विजय !!
