Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

देवी महागौरी

देवी महागौरी

1 min
138


रूप ते नवरात्रात

महागौरी भुजा चार

शांत स्वभावाची माता

रंग गोरा असे फार


करण्यासाठीच प्राप्त

भगवान शंकराला

केली तपस्या कठोर

संकल्पच होता केला


तपस्याच कठोर ती

काळे शरीर पडले

भगवान शंकराला

तेच नाही आवडले


भगवान शंकर हे

झाले प्रसन्न देवीला

स्नान पवित्र पाण्यात

गंगा माई या नदीला


पूजा स्मरण तिचेच

भक्तांसाठी सुखकारी

तिचे ध्यान करणारे

दूर संकट ती करी


कार्य अशक्य कोणाचे

तिच्यामुळे शक्य होई

पाप, संताप, दुःख ते

दूर पळूनच जाई


वय आठ वर्ष तिचे

असे मानलेच जाते

श्वेत वस्त्र तिचे असे

पुण्य फळ तीच देते


Rate this content
Log in