देवाला पडलेले काही प्रश्न
देवाला पडलेले काही प्रश्न


या जगात इमानदारी म्हणजे तांदळात
खडा की खड्यांमध्ये तांदूळ हे समजतच नाही
हिमालयाचे गुणगान गाण्यात सुख असलं तरी त्याने दिलेल्या नद्यांना
अस्वच्छ करताना यांना लाज का वाटत नाही?
पैसे कमवताना जिथे जात पात बघत नाही तिथे मदत करताना
भेदभाव का करतात हा माणसाचा भाव मला कळतंच नाही
मर्यादा आहे म्हणून माणूस आणि मर्यादा नाही
म्हणून तो प्राणी असं जर असलं तर आज माणूस कोण
आणि प्राणी कोण हा फरकंच मला कळत नाही
अगरबत्तीचा सुवास आला की लहानपणी आरतीला उभी राहणारी
आज दारूचा वास आला तरच एकत्र येतात हे गणित काही जुळंत नाही
पहिले वडिलांची चप्पल मुलाच्या पायाला आली की कामाला लावायचे
मग डिग्री चं महत्व वडिलांच्या चपली पेक्षा जास्त कधी झाली हे मात्र कऴंतच नाही
आई बोलली याचा राग येण्यापेक्षा
आई का बोलली याचा विचार कधी कुणी का करत नाही?
बोलायचं आहे बरंच काही
पण आजकाल ऐकत मात्र कुणी नाही