डोळे उघडू पहा
डोळे उघडू पहा
1 min
483
देवळाच्या पायरीवर आज मला तो बसलेला दिसला,
आणखी किती मागशील म्हणत माझ्याकडे बघून हसला,
दगडामध्ये देव शोधत तू फिरत बसलीस,
माणसामधल्या देवला अशी कशी हरवून फसलीस,
रोज कळशीभर दूध माझ्यावर ओततेस,
वाटेवरच्या उपाशी लेकराकडे एकदा तरी का बघतेस,
मी खरा कुठे आहे हे एकदा डोळे उघडून पहा,
सापडलो जर मी तुला तर माझ्या जवळच रहा.
