चकवा••
चकवा••
1 min
222
तू असल्याचा मला का
हा भास होतो खोटा
मिळतो कायम मला
तुझ्या आठवणींचा चकवा••
स्वप्नाच्या या दुनियेत
फिरतो मी तुझ्या मागे मागे
शोधते ही नजर माझी
कायम तुला ग राणी••
स्पर्श तुला करता माझ्या
अंगावर यतो प्रेमाचा शहारा
स्पर्श होता तुझा की
माझ्या या मनाचा चकवा••
प्रेमाची ही वाट माझी
कायम चुकते या चांदराती
या चांदणीतही दिसतो मज तुझाच चेहरा
मग मिळतो एक क्षणाचा चकवा••
चकवा माझ्या या मनाचा
कुणाला नाही समजला
आठवणीत तुझ्या मी असता
मिळतो मला माझ्या कवितेचा चकवा••••
