चिंचेच्या झाडा खालची शाळा....
चिंचेच्या झाडा खालची शाळा....
चिंचेच्या झाडा खाली, होती आमची शाळा,
शिकवला जिने आम्हास, जीवनाचा धडा.
धर्म आणि जातीचा, शाळेत नव्हता फरक,
श्रीमंत असो वा गरीब,सगळे बसत सोबत.
निष्पाप त्या मनात, न कसले भेद , न बंध,
शाळेत दरवळे चोहीकडे, आपुलकीचा गंध.
अटुट झाली शाळेतच, सर्वांची मैत्री ,
भर पावसात ही आम्हास, लागत नसे छत्री.
ना काही मनी, ना काही ध्यानी,
घेऊन निघायचे सर्व जन , पुस्तक आणि पाटी.
अबोध त्या मनावर, संस्कारांचा ठप्पा,
शिस्त आणि समजुतीचा, पाया झाला पक्का.
गुरुजींची छडी,तेव्हाच हातांची घडी,
नियमांची ती रेखा, कोणीच नाही मोडी.
कवायती मध्ये तेव्हा, होत राहीच्या गमंती,
डोळे मीटून सर्व मात्र , प्रार्थनेत रमती.
इवलाश्या हातामधे , छोटासा डब्बा,
संपत नव्हत्या कधीच मात्र , आमच्या त्या गप्पा.
कवळ्या मनाचे, सारे विश्वच शाळेत व्यापले ,
विचारांच्या तळयामध्ये, भविष्याचे मंथन सुरू झाले.
अंकांची ओळख, ध्यास,
शाळेतच सुरू झाला, आयुष्याचा अभ्यास.
भाषेचे माधुर्य, जीवनाचे गणित,
दिव्य विद्येने झाले, सगळे काही सुसंगतीत.
चिंचेच्या झाडा खाली, होती आमची शाळा,
शिकवला जिने आम्हास, जीवनाचा धडा ....
