चिंब भिजलेला एक क्षण
चिंब भिजलेला एक क्षण


पाऊस
एकदा ना पाऊस माझ्याकडे राहायला आला.
त्याचा टपोरा थेंब हळूच माझ्या कानाच्या पाळीवर थबकला.
हळूच गुणगुणला कानात,"हसत जा की थोडं मी आल्यावर
त्याला मी सुद्धा सांगून टाकले सत्य रागात.
"हसण्याचा मला आधी सराव करावा लागतो
मनावर झालेला घाव जरा लपवून ठेवावा लागतो
तो हसला, आणि म्हणाला,
अग माझं ही नक्की काय वेगळं असतं
तुझी आठवण आल्यावर मलाही यावंच लागतं.
माहिती आहे तुला,
तुझ्या मनातला कल्लोळ तुला कळेनासा व्हावा म्हणून ढगांना ही घेऊन येतो गडगडाटासह,
तुझ्या प्रतिभेचा प्रकाश तू ओळखावा म्हणून विजांना पण घेऊन येतो कडकडाटासह,
सर्व तुझ्यासाठीच ना गं?
तुझ्या अश्रूंसोबत ओघळण्यासाठी मी सुद्धा विसावतो तुझ्याच गालांवर,
एवढे ऐकून माझ्या व्याकुळ भावनांचा फुटलाच बांध
विचारलं त्याला," कस ओळ्खतोस रे इतकं मला?
पावसाने एकवटून त्याचे सर्व पंचप्राण, उत्तर दिले एकच छान
तुझ्या नि त्याच्या प्रेमाचा मीच होतो एकमेव साक्षीदार.
मीच होतो एकमेव साक्षीदार