STORYMIRROR

Gajanan Bapat

Others

3  

Gajanan Bapat

Others

चेतना

चेतना

1 min
26.7K


*चेतना *

माथेफिरू युवा देती-

   देश बरबादीचा दुवा,

अतिरेक्यांचा नित्य येतो 

 सीमेपलीकडूनी थवा l


भयाण आहे हे लक्षण 

  देश यातून वाचवा,

किर्ती पुढिलांची आता -

  नित्य येथे जागवा l


यवनांनीही लाजावे 

  असे घडते येधवा ,

पाहिजे -शिवाजी ,राणा 

  आणि बाजीराव पेशवा l


दैत्य सारे जन्मले जे -     होते मारीले तेधवा ,

संव्हाराया पुन्हा त्याना 

  शक्ति देरे केशवा l


चांगले आहे इथेही -

 पण होतो -वाईटाचा गवगवा

फावलें अन् माजले देशद्रोही 

त्यांनी दुषित केली इथली हवा l

हा देश यातून -

पुन्हा पावेल किर्तिमान 

व्यर्थ ना जाणार -

देश भक्तांचे बलिदान !

किती नाना संकटे -

आली अन् गेली 

पावन ही भूमि -

अजिंक्यच राहिली !


आता कुणि पाहिल वक्री 

त्यास ठेचावा मारावा !

'जयहिन्द ''वंदेमातरम् '

हा घोष त्रिभूवनी घुमवावा ..!




Rate this content
Log in

More marathi poem from Gajanan Bapat