चालत राहा पुुढे तू
चालत राहा पुुढे तू


तू हरणार नाही तू जिंकणार आहे
या संकटाला धैर्याने तू भिडणार आहे
पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे स्वप्न सारी साकार होणार आहे
धीर नको सोडू तू चालत राहा पुुढे तू
वादळ हे संपेल ज्वाला ही विझेल
अडथळ्यांची पाऊलवाट फुलांनी सजेल
पुन्हा ओठांवर हसू खुलणार आहे मोकळा श्वास तू घेणार आहे
धीर नको सोडू तू चालत राहा पुुढे तू
अंधःकार भेदून सारा वाहणार आशेचा वारा
उरात ठेवून हिंमत दिसेल स्वच्छंद किनारा
पुन्हा जगात तू फिरणार आहे उत्तुंग भरारी घेणार आहे
धीर नको सोडू तू चालत राहा पुुढे तू