बरस पावसा
बरस पावसा
"बरस पावसा (पाळणा चालीत)
आग ओतीत थांबला सूर्य
पावसाने आता गारवा केला,
येता झाला पावसा आता,
बरस रहा तू आता......
शेतकरी बाप चिंतेत होता
ढोरांना पोसन साहस त्याच,
पावसा शिवाय सर्वंच खोटं
बरस रहा तू आता........
तुझाच उपकार आता रे पावसा
दुष्काळावर केली तू,मात,
थोडा तू केला जगण्यास आधार
बरस रहा तू आता.........
ओलं वातड पावसा मध्ये
पेरून आला माझा बाप,
उगवत्या डीराला तुझा आधार ,
बरसण्यास तुला कसले माप.......
बरसत रहा तू चार मास
पुढच्या जीवनाचा तू आमचा आस,
नदी, नाले दोन्ही काठ,
बरस रहा तू आता..........
