बोट -एक प्रवास
बोट -एक प्रवास
1 min
27.2K
असंख्य लाटा जरी समुद्रात
बोटी येतात जातात परि क्षणात
भरती, ओहोटी नेहमीची
म्हनूनचं लढत होते चुरशीची
बोटीचा ध्यासच तरंगण्याचा
जणू अट्टहास काम पूर्ण करण्याचा
लहान मोठया लाटांचा असतो मारा जोराचा
असे होतानाहि मार्गेपुढे जाण्याचा
नावाडी दाखवतो दिशा
पण वारा फ़िरवतो दशा
मग एकच विचार असा
अनुभव देइल की पाठविल मोक्षा
वेळ असते परिक्षेची
त्यातुन मार्ग काढण्याची
तरून गेलो तर जिंकण्याची
नाही तर नवीन काही अनुभवण्याची
