बोलकं पैंजण
बोलकं पैंजण
1 min
223
पैंजणाने पैज लावली, तु बोलकी की मी बोलका
मज वाजता, का दाटे भावणांचा विळखा
बोलकी मी अबोल झाली, प्रश्नाने त्याच्या
तो वाजून घोळ घाली गुंत्यात माझ्या
मी पार गुंतली तरी ,त्याचं वाजणं सुरू
कळेना मला,आता या पैंजणाचं काय करु
मग मी विचार केला, हळूच डोळे मिटले
रूणझुणन्याचा आल्हाद घेत,मनाचे सारे प्रश्न सुटले.....
