बंधन
बंधन

1 min

160
तुझ्या असण्याने माझे आयुष्य इतके सुंदर बनून जाते,
जितके एखाद्या व्यक्तीचे हास्य सुंदर बनते गालावरच्या खळीमुळे
एखाद्या पक्षाचा जितका विश्वास त्याच्या पंखांवर असेल ना,
अगदी तितकाच विश्वास माझा तुझ्या प्रत्येक शब्दावर असतो
लहानगं बाळ आपल्या आईच्या कुशीत जितके सुरक्षित असते ना,
अगदी तितकेच सुरक्षीत मी असते तुझ्या सोबत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात वावरताना
सदैव माझी "रक्षा" करायचे वचन तर तू निभावतोसच,
पण त्याच सोबत समाजाचे सारे "बंधन" मागे सारून
यशाच्या आभाळात गगनभरारी घेण्याचे बळ माझ्या इवल्याशा पंखात तुच भरतोस