बलात्कार वगैरे ...
बलात्कार वगैरे ...
1 min
2.6K
धावशील का रे चक्रपाणी आता तू
इथे वाढलेत बलात्कार वगैरे...
कुठे झाकाव्या आम्ही लेकी बाळी
करशील का रे काही चमत्कार वगैरे...
वेळ वाईट आली, तुझी मंदिरेही बाटली
कालिया पुन्हा काढी फुत्कार वगैरे...
गुदमरून गेला आता श्वास आमचा
विसरलोय देवा तो सुस्कार वगैरे...
फक्त प्रार्थनेने येत होतास आधी तू ...
आता करावा लागतो का सत्कार वगैरे ...
