भक्ती.
भक्ती.
1 min
185
सुनी -सुनी आहे रे तुझी पंढरी
चुकतेय रे ही पंढरीची वारी
नाही फुलत आता भक्तीचा मळा
हळहळून जाती सारी वारकरी.
टाळ, चिपळ्या ,मृदुंग
सारे बघती वाट तुझी
ओढ लागली भजनाची
अपुरीच राहीली भक्ती तुझी.
मनात तुच आहेस पांडुरंगा
तोंडाच तुझाचं आहे अभंग
आस लागली आता ही वेडी
कधी होनार रे किर्तनात दंग.
तुच विठोबा माऊली आमची
तुच मायेची सावली आमची
चंद्रभागाही वाट पाहते रे
माऊलीच्या सुंदर त्या पालखीची.
अडानी आहेत रे वारकरी
जातात शोधाया तुला मंदिरी
वैकुंठाचा आहेस रे तु राजा
पाई-पाई करतात रे वारी.
तुझ्या दर्शनाची लागली आस
देवा मी हात जोडते घरच्याघरी
जीव झालाय कसा वेडापिसा
दूर लवकर कर रे ही महामारी.
