स्त्री
स्त्री
1 min
223
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील
सत्य कहाणी आहे,
जेव्हा मी मरून जाईन
तेव्हा मला जाळू नका.
आयुष्यभर जळत होते
अजुन चटके देउ नका
आयुष्यभर रडत होते
शेवटी रडने ऐकवू नका.
माझ्या मृतदेहावर कपडा
घालू नका
आयुष्यभर बेअब्रू केले
आता झाकायचे सोंग करू नका.
देहाचे ओझे वाहू नका
आयुष्याचे ओझे मीच वाहिले
आता उपकाराचे ओझे देऊ नका
तुमचे सोंग आयुष्यभर पाहिले.
मी मेल्यावर हार घालू नका
आयुष्यभर पायाखाली तुडवले
आता पाया पडू नका,
तेव्हा पायाने लाथाडले.
