बहीण माझी लाडकी
बहीण माझी लाडकी

1 min

139
संस्कृती धरोहरा
रक्षाबंधन सण साजिरा
बहीण माझी लाडकी
मी बंधू तिचा गोजिरा
दीदी माझी परीसारखी
जणू दिसे रुपगर्विता
माझ्या आयुष्यात आहे
ती सर्वे सर्वथा
स्वभावाने असे मायाळू
भूतदये ती कनवाळू
साऱ्यांशी वागे स्नेहपूर्ण
अंतर्मनी बहु दयाळू
जाताना नांदाया सासरी
अश्रूंना केली वाट मोकळी
सुखभरल्या आयुष्यी
परि नित्य असेल पोकळी
बहिणाई माझी लाखात एक
दृष्ट न लागो कोणाची
नित्य तया सौख्य लाभो
ईश्वरास आस एका भावाची