Swati Korgaonkar

Others


3  

Swati Korgaonkar

Others


विषय -भाऊ माझा लाडका

विषय -भाऊ माझा लाडका

1 min 0 1 min 0

संस्कृती धरोहरा

रक्षाबंधन सण साजिरा 

भाग्यवान मी जगताती 

बंधू मिळे मज गोजिरा


नात्यांमधली पावित्र्यता 

जशी कृष्ण द्रौपदीस 

प्रेम रुपी वात्स्यल्याने 

माया देतो बहिणीस


सुखी नांदते मी संसारी 

सय येते मनी हुरहुर 

संकटसमयी त्याच्या मज 

उरी माजतो काहूर 


आठवे माझं बालपण 

लुटूपुटूचे भांडण 

नयनात आसवे दाटुनि 

भरून जाते अंतर्मन 


भाऊ माझा लाखात एक 

दृष्ट न लागो कोणाची 

नित्य तयास सौख्य लाभो 

ईश्वरास आस एका बहिणीची


Rate this content
Log in