STORYMIRROR

Vrushali Sungar

Others

3  

Vrushali Sungar

Others

बघतो मी तुला उमलताना

बघतो मी तुला उमलताना

1 min
13.9K


बघतो मी तुला उमलताना

रोज नव्याने बहरताना

दिवसाणित रुप तुझे हे खुलताना

बघतो मी तुला उमलताना

रोज नव्याने बहरताना 

परिचित होतीस तू मजसाठी 

अस्तित्व तुझे नव्याने आज भासताना

बघतो मी तुला उमलताना

रोज नव्याने बहरताना 

दिले असे वरदान देवाने 

कसे समस्त स्त्री जातीला 

नाळ ही जोडली फक्त मायेच्या गर्भाला

बघतो मी तुला उमलताना

रोज नव्याने बहरताना 

लेकराची माझ्या माय होताना 


Rate this content
Log in