बाप
बाप
कुटुंबाचा प्रमुख असला तरी सर्वांचा ऐकून घेत असतो
स्वतःला काय वाटत त्यापेक्षा कुटुबांला महत्व देत असतो
मुलांच्या शिक्षणासाठी दिवस रात्र मेहनत करतो
आजारी पडला तर २ रुपयाच्या गोळीवर उपचार घेतो
स्वतःची फाटकी कपडे त्याला कधीच दिसत नाहीत
मुलामुलींना महागडे कपडे घेतल्याशिवाय त्याचा जीवातजीव रहात नाही
बाप हा बापच //१//
भूक लागली असली तरी तो काही खात नाही
पण घरी जाताना मुलांना खाऊ घेऊन गेल्याशिवाय रहात नाही
टाईमपास नाही केला कोणताही क्षण
सतत कामावर बापाच मन
n> वेळेप्रंसगी हात तो जोडेल पण मुलीचे लग्न थाटातच करेल रडताना दिसणार नाही पण नक्कीच तो खचतो मुलीला विश्व मानणारा बाप मनात ढसाढसा रडतो बाप बापच असतो //२// चपलीतून पाय जमिनीला लागतो उन्हातून तो सर्व सहन करतो नाही मिळत त्याला पंख्याचा वारा अंगातून वाहतात घामाच्या धारा स्वतःसाठी नव्हे तो कुटुंबासाठी जगतो घराचे ओझे डोक्यावर घेणारा बाप बाप हा बापच असतो //३//