बाप
बाप
1 min
245
बाप शेवटी बाप असतो,
आयुष्यभर दुरून पिल्लांवर नजर ठेवणारी घार असतो,
अनुभवाचे बोल असतो, शब्दांचाच जोर असतो,
अभ्यासासाठी सर असतो, खेळासाठी कोच असतो,
न सांगता पिकनिकसाठी पैसे काढून देत असतो,
घरचा आधारस्तंभ असतो आणि घरचा पोशिंदही तोच असतो,
जिवंतपणी कितीही ताप दिला तरी
मेल्यानंतर पोरांच्या डोळ्यातून येणारा अश्रूंचा झरा असतो,
पोरांचा खंबीर पाठबळ असतो,
डोक्याला ताप असतो पण बाप शेवटी बाप असतो.
