बाप
बाप

1 min

493
काय लिहू किती लिहू
शब्दात वर्णन मांडता येत नाही
कवितेचा चार ओळीत
बापाचे वर्णन सांगता येत नाही
कष्ट सोसले अपार
म्हणून माझे अस्तित्व घडले
कठोर तेव्हा वागले तुम्ही
मला चांगले संस्कार लागले
माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
सतत कष्ट धडपड करायचे
नेहमी शाबासकी देऊन
थकले तरी कधीच नाही थांबायचे
"बाप" नावाची जादू खरी
मला नेहमी जादूगार वाटतो
मला नेहमी देवाच्या रुपात
माझा बापच देव माणूस भासतो