STORYMIRROR

Subhadra Warade

Others

5.0  

Subhadra Warade

Others

बाप पिंपळाचे झाड

बाप पिंपळाचे झाड

1 min
1.3K


बाप उन्हात राबून

करीतसे कामधंदा

शेत पिकवून बाप

होई जगाचा पोशिंदा ।।१।।


छोट्या संकटात ओठी

नांव आईचेच घेतो

आले मोठेसे संकट

तेव्हा बाप आठवतो ।।२।।


झळा उन्हाच्या सोसते

झाड उभे पिंपळाचे

सदा सावली देणारे

रूप भासते बापाचे ।।३।।


माय वात्सल्याचा झरा

सदा ममता झरते

प्रेम रांगडे बापाचे

पुत्रा पाठी बळ देते ।।४।।


बाप मुलांच्या पाठीशी

असे भक्कम आधार

बाप राबतो कष्टतो

सुखे चालतो संसार ।।५।।



Rate this content
Log in