बालपण
बालपण
1 min
141
ख़रंच बालपण किती
सुंदर ते असतं
तेव्हा कुठलंच टेंशन
माणसांच्या मागं नसत
खेळण्याबागडण्याचं
वय ते असतं
खाण्यापिण्याचंदेखील
भान माणसाला नसतं
बालपणातील आठवणी
काही खूप मोठया असतात
कायमस्वरुपी रुजून
त्या खोल मनात बसतात
आठवणी त्या जेव्हापण
काठावर येतात
अलगदपणे डोळयामध्ये
आसवं आणून जातात
विसरताही विसरु नाही
शकत कुणी कालपण
कारण त्यामध्ये असतं
जेचं तेेेचं बालपण
