बालपण
बालपण
थोडसं भुतकाळात डोकावून बघु
आठवणींना सोबत घेऊन पुन्हा बालपण जगु
चेह-यावरचे निरागस भाव,
पिल्यापासुन ते बाळापर्यंत घरच्यांनी ठेवलेलं टोपण नाव.
न कसली चिंता, न कसली काळजी, दिवसभर चालायचा
मातीचा अन् बाहुलीचा खेळ, कळालच नाही कधी निघून गेली वेळ. 2
आताच्या सारखी नव्हती लाईट अंधार दुर करायची दिवा आणि वात,
प्रत्येकाच्या डोक्यावरून फिरायचा आजीचा मायेचा हात.
तासभर रुसल्यावर एक-दोन रुपये भेटायचे,
तेच रुपये लाख मोलाचे वाटायचे.
आज मागताच क्षणी दहा रुपयांची नोट मिळते,
पण त्या एक रुपयांचा आनंद दहा रुपयांच्या नोटेत मिळतो का?
कंटाळा आला शाळेचा की पोटात अन् डोक्यात दुखायचं,
शाळा बुडवण्याचं हे कारण ठरलेल असायचं
मातीच्या अन बाहुलीच्या खेळांचा झालाय अस्त,
कारण आजचं बालपण हे मोबाईल मध्ये झालय व्यस्त
आता उरल्यात फक्त
वस्तूंच्या साठवणी, गेले ते दिवस अन् राहिल्या फक्त बालपणीच्या आठवणी.
