STORYMIRROR

Pritam Chaure

Others

3  

Pritam Chaure

Others

मैत्रीण - कशी असावी ?

मैत्रीण - कशी असावी ?

1 min
238

एक तरी मैत्रीण असावी, 

मनावर राज्य करणारी,

माझ्या दुःखात रडणारी, 

एक तरी मैत्रीण असावी. 


चेष्टेने, काळ्या म्हणणारी, 

जीवापाड काळजी घेणारी, 

अपयशात धीर देणारी, 

मला उज्ज्वल भविष्याकडे नेणारी, 

एक तरी मैत्रीण असावी. 


वेळेला आईची माया, 

तप्त उन्हात बापाची छाया देणारी, 

एक तरी मैत्रीण असावी. 


माझ्यावर हक्क गाजवणारी, 

भावनेच्या कल्लोळात भिजवणारी, 

एक तरी मैत्रीण असावी. 


नाही बोलू शकलो तर रागवणारी, माझ्यावर रूसणारी, 

असंख्य वेदना लपवून हसणारी, 

एक तरी मैत्रीण असावी. 


प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणारी, 

संकटात माघे न हटणारी, 

एक तरी मैत्रीण असावी. 


चार - चौघात भाव खाणारी, 

मला माझ्या स्वप्नांजवळ नेणारी, 


एक तरी मैत्रीण असावी,

जीवाला जीव लावणारी, 

माझ्या वेडेपणात मला समजून घेणारी.

एक तरी वेडी मैत्रीण सर्वांना असावी. 


Rate this content
Log in