असेन मी
असेन मी
1 min
511
मृत्यू सर्वाचाच अंत
तरी भास असेन मी
देह त्यागला आत्म्याने
जगासाठी नसेन मी //१//
खळाळत्या झऱ्यामध्ये
पाणी होत वसेन मी
ओघळत्या लाटेमध्ये
आकस्मिक हसेन मी //२//
उपवनी पानेफुले
वास्तव्यास सुगंधात
प्रेम जगतास होता
श्वास मी प्रेमबंधात //३//
आकाशात भरारीत
पक्षी मीच विहरेन
रानी मयूर नाचात
पिसासम थिरकेन //४//
साहित्यिक प्रकारात
मीच राहीन उरून
होत कथा नी कविता
शब्द वर्ण बहरून //५//
अमरत्व असे काय
त्याची होईल जाणिव
सारे सुरळीत जगी
माझी भासेल उणीव //६//
