आभूषण
आभूषण
1 min
13
दागिने
स्री जन्मी यावे
शालीनता अंग
अलंकारांसंग
स्रीत्व शोभावे
तो भांग टिका
भाळी कुंकू खरा
नथीचा नखरा
नसेच फिका
कर्णफुलानी
आंबाडा नि फूल
भिकबाळी डूल
स्वर्णतुलानी
ठुशी गळ्यात
तो चपलाहार
अन् राणीहार
कार्यक्रमात
कंबरपट्टा
सुंदर मेखला
तनूस शोभला
तो नट्टापट्टा
पायी जोडवी
पैंजण सुरेख
नाद देखरेख
स्त्रीत्व घडवी
