अर्पण
अर्पण

1 min

218
अर्पण केले मी
जीवन सारे तुला
मन मंदिरात माझ्या
पूजते मी तुला
भाव भक्तीच्या रंगात
संसार असा थाटला
नात्यातील प्रेम बंधनात
नित्य आपलेपणा जपला
सासू सासरे साऱ्यांना
दैवत मी मानले
त्यांच्या सेवेसाठी
जीवन साकारले
माझे विचार, स्वप्नं सारे
तुझ्या चरणाशी अर्पण केले
तू माझा नि मी तुझी अशी
आयुष्य आपुले सुंदर झाले