अंतरीचे मन
अंतरीचे मन
1 min
49
माणसाच्या मना,असे कसे विचार तुझे
जसे करशील विचार,तसेच तुला जग दिसे !!
पहातासी पशुंकडे तू ,दिसे ममता तिथे
दोन माणसांमध्ये स्वार्थीपणा वसे !!
वाटते मजला असेल तू खरा मानवा
जिथे पहावे तिथे दिसे मला स्वार्थीपणा !!
फोटो तुझा असेल गोरा की सावळा
पण तुम्ही त्यातला माणूस पणा ओळखावा !!
काढता तस्वीर तू आहेत दोनच रंग रे
ओळखता अंतरीचे मन त्यात भेटते अंतरंग रे !!
ओळख तू मानवा माणसाला तुला दुखः नाही होणार
शेवटी तू तुझीच मानवता जगवणार !!