* अमृतकन्या *
* अमृतकन्या *

1 min

156
एक तरी मुलगी हवी
प्रत्येकाच्या घरी...
संसाराच्या वेलीवर
फुलणारी कळी..
उगाच नाही बोलत
तीला धनाची पेटी
नशीबवान असतात
ज्यांना होते पहिली बेटी..
दुडूदुडू दुडूदुडू धावते
जेव्हा माझ्या अंगणात
लक्ष्मी च वाटे
आली माझ्या पदरात..
लाडी वाडी तिचे बोलणे
हे करी घायाळ
विसरून सर्व भान
वाटते ऐकावस..
असते बाबाची ही
परी आईची लाडकी
म्हणून च एक तरी
मुलगी हवी प्रत्येकाच्या घरी...
संसाराच्या वेलीवर
फुलणारी कळी...