STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

अधिकार नाही

अधिकार नाही

1 min
187

टोमण्यांनी, प्रश्नांनी सतावेल तुला दुनिया

पण प्रतिप्रश्न करण्याचा अधिकार तुला नाही

चुकांमधून शिकावं, पडावं, धडपडावं, पण

चुकून परत शिकण्याचा अधिकार तुला नाही

रडावं रात्री एकट्यातंच कोंडून स्वतःला, पण

ओरडून रडण्याचा अधिकार तुला नाही

दुखः लपवण्याची तुझी ही धडपड निरागस

खळखळून हसण्याचा अधिकार तुला नाही

तुझं चोरलेलं मन शोधत फिरावं तू असंच,पण

प्रेमात पडण्याचा अधिकार तुला नाही

तू काळी, तू जाड, तू चेहऱ्याने ठीकठाक आहेस, पण

स्वतःला निरखून बघण्याचा अधिकार तुला नाही

जळून खाक झाली दुनिया निंदकाची

कुणावर जळण्याचा अधिकार तुला नाही

गुलाबाच्या पाकळ्यांचही गुलाब जल बनवणारी दुनिया

मेल्यावरही जगण्याचा अधिकार तुला नाही


Rate this content
Log in